Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लवकरच बनणार आई, बेबी शॉवरचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 17:27 IST

नवीन  वर्ष मोहित आणि आदितीसाठी आनंद घेऊन येणार ठरलं. मे महिन्यात आदित बाळाला जन्म देणार आहे.

''कुणी तरी येणार येणार गं''…. या गाण्याच्या ओळी सध्या टीवी अभिनेत्री अदिति मलिकच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सध्या गरोदर असून ती सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार असल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. 

'कुल्फी कुमार बाजेवाला'फेम मोहित मलिकची मालिका हिट ठरली होती.  पत्नी अदिती मराठी आहे. अदितीचा नुकताच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अदितीचा पारंपरिक मराठी अंदाजात नटली होती.

 

या फोटोत तिने नकात नथ, कपाळावर हळद कुंकू आणि डोक्याला फुलांचा गजरा बांधल्याचं दिसत आहे. त्यामुळे अशाप्रकारे साजश्रृंगारात ती अधिक सुंदर दिसत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत. अदिती आणि मोहित मलिकच्या कुटुंबातील काही सदस्यही उपस्थित होते.

नवीन  वर्ष मोहित आणि आदितीसाठी आनंद घेऊन येणार ठरलं. मे महिन्यात आदित बाळाला जन्म देणार आहे. 'बॉम्बे टाईम्स' शी बोलताना मोहित म्हणाला की, अदितीने गुड न्यूज दिली तेव्हा माझा आनंद गगणात मावेनासा होता. मोहित म्हणतो की, त्या दिवशी शूटिंग करत होतो, जेव्हा अदितीने त्याला फोन करून सांगितले तेव्हा मात्र तो खूप खुश होता.

मोहित आणि आदितीची पहिली भेट टीव्ही सीरियल 'मिली' च्या सेटवर होती. 1 एप्रिल 2006 रोजी मोहितने आदितीला प्रपोज केले, त्यानंतर 4 वर्षांच्या डेटिंगनंतर 1 डिसेंबर 2010 रोजी त्यांचे लग्न झाले होते.