Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठी 2: परागचा झाला राग अनावर, घरात होणार राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 11:45 IST

बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यामध्ये बरीच भांडण, वाद- विवाद, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत.

ठळक मुद्देबिग बॉसने हे सांगितल्यानंतर काल परागने स्वत:लाच मॅनेजर बनवले आणि त्यामुळे दोन्ही टीममध्ये वादाची ठिणगी उडली

बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यामध्ये बरीच भांडण, वाद- विवाद, आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. बिग बॉस यांनी विरोधी टीमला या टास्कमध्ये हरविण्यासाठी साम, दाम दंड, भेद याचा उपयोग चातुर्याने करायला सांगितले. तसेच टास्कमध्ये दिलेली ऑर्डर एकाच टीमने पूर्ण करायची आहे हे देखील सांगितले आहे. बिग बॉसने हे सांगितल्यानंतर काल परागने स्वत:लाच मॅनेजर बनवले आणि त्यामुळे दोन्ही टीममध्ये वादाची ठिणगी उडली.

या टास्कमध्ये मॅनेजरमध्ये झालेल्या डील प्रमाणे विणाच्या टीमने परागच्या टीमला २ कपडे द्यायचे आहेत. परंतु विणाच्या टीमने यावर उत्तम योजना आखली आहे. विणाची टीम परागला सांगणार आहे आमच्या टीमचा मॅनेजर सुट्टीवर आहे आणि यावरूनच विणा–परागमध्ये वाद होणार आहे.

याच टास्क दरम्यान पुन्हा शिव विरुध्द नेहा हे दृश्य दिसणार आहे. ज्यामध्ये शिव साम, दाम दंड, भेद हे मोठ्या आवाजात बोलल्याने समोरच्या टीमची चिडचिड झाली आणि हेच होत असताना परागचा राग अनावर झाला. तोदेखील शिवला टक्कर देत साम, दाम दंड, भेद असे मोठ्या आवाजात बोलू लागला. परंतु यामुळे परागलाच त्याचाच त्रास तर होणार नाही ना ? हे आजच्या भागामध्ये कळेलच... घरात होणाऱ्या टास्क मध्ये सदस्यांनी स्वत: संयम ठेवणे अत्यावश्यक असते परंतु हे सदस्यांना कधी समजणार कोणास ठाऊक ? 

टॅग्स :बिग बॉस मराठीपराग कान्हेरेनेहा शितोळेशीव ठाकरे