प्रशांत भट्टने एक अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने इतिहास, संस्कृती यांसारख्या अनेक मालिकांत काम केले आहे. प्रेक्षकांनी नेहमीच त्याच्या अभिनयाचे कौतुक केले होते. पण अभिनयानंतर तो निर्मितीकडे वळला. अनेक वर्षं मालिकांच्या निर्मितीमध्ये व्यग्र असल्याने त्याने अभिनयाकडे दुर्लक्ष केले. पण आता जवळजवळ 10-15 वर्षांनंतर तो पुन्हा अभिनय करणार आहे. जाना ना दिल से दूर या मालिकेत अर्थवच्या वडिलांच्या म्हणजेच रमाकांतच्या भूमिकेत तो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
प्रशांत परतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 11:58 IST