Join us

‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’च्या सेटवर बनले ओजस्वी अरोरा आणि आरिया अगरवाल नवे दोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 15:47 IST

सोशल मीडियावर नवे मित्र जोडणे ही एक गोष्ट असली,तरी प्रत्यक्ष जीवनात नवे मित्र निर्माण होणे ही अगदी भिन्न गोष्ट ...

सोशल मीडियावर नवे मित्र जोडणे ही एक गोष्ट असली,तरी प्रत्यक्ष जीवनात नवे मित्र निर्माण होणे ही अगदी भिन्न गोष्ट आहे. ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेतील ओजस्वी आणि आरिया यांना या मालिकेच्या सेटवर एकमेकांमध्ये आपला घनिष्ठ मित्र सापडला. दिवसभर हे दोघेही या मालिकेच्या सेटवर एकत्र राहात असले, तरी त्यांना एकमेकांचा कंटाळा आलेला नाही. या दोघींचे सूर चांगलेच जुळले असून त्या आपल्या हास्यविनोदाने मालिकेच्या सेटवरील वातावरण जिवंत करीत असतात. इतकेच नव्हे, तर चित्रीकरण संपल्यावरही त्या जेवायला आणि शॉपिंगला एकत्रच जातात. केवळ मालिकेतच नव्हे, तर वास्तव जीवनातही त्या एकमेकींच्या ख-या जिवलग मैत्रिणी बनल्या आहेत. ओजस्वी सांगते, “या मालिकेसाठी आरिया आणि माझी निवड सर्वात शेवटी झाली. इतर सर्व कलाकार एकमेकांना पायलट भागापासून ओळखत होते. त्यामुळे या सर्वांमध्ये आम्ही दोघीच काहीशा नवख्या होतो आणि त्यामुळे सुरुवातीला आम्हा दोघींना इतरांबरोबर काम करताना काहीसं अवघडल्यासारखं वाटत असे. या क्षेत्रात मला फारसे मित्र-मैत्रिणी नाहीत. कारण माझ्या मते मैत्री ही फार दुर्मिळ गोष्ट असून ती बिनशर्त असावी लागते. आरियाबरोबरची माझी मैत्री ही नेहमीच्या मैत्रीपेक्षाही अधिक काहीतरी आहे. ती माझी बहीणच आहे म्हणा ना. स्नॅपचॅट असो, परी की करी असो की दुसरं काही- या सर्वांत ती मला कायम साथ देते.”या मालिकेत ओजस्वी ही परीची, तर आरिया ही कुसुमची भूमिका रंगवीत आहे.‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेत विनोदी पध्दतीने केले आहे. आपल्या अतिआग्रही स्वभावामुळे सासूला कसे अनेक त्रास सोसावे लागतात, हे दर्शविणारी ही मालिका आहे. कधी कधी गरजेपेक्षा अधिक गोष्टींची मागणी ही संकटांना निमंत्रण देते, हे या मालिकेत हलक्याफुलक्या पध्दतीने दाखविले आहे. आपली सून अगदी परिपूर्ण आणि निर्दोष असावी, याची हाव धरणे अयोग्य असून आपल्या सुनांकडून सासवांनी अवाजवी अपेक्षा करू नयेत, असा संदेश ही मालिका देते.