Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बाजीराव मस्तानी मालिकेत झळकणार एक वर्षाचा चिमुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 12:36 IST

संजय लीला भन्साळीचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेल्या बाजीराव ...

संजय लीला भन्साळीचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेल्या बाजीराव यांच्या भूमिकेचे सगळ्यांनीच कौतुक केले. त्याच्यासोबत प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोणदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. त्यांनीदेखील त्यांच्या भूमिका चोख बजावल्या होत्या.बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या यशानंतर बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यावर आधारित पेशवा बाजीराव ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत पल्लवी जोशी, अनुजा साठे, मनिष वाधवा, रझा मुराद, रविंद्र मंकणी प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेचा गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्याला एक प्रोमो पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये एक छोटेसे बाळ आपल्याला दिसत आहे. हे बाळ केवळ वर्षाचे असून हे मालिकेत बाजीरावांच्या बालपणाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चिमुकल्याने सेटवर सगळ्यांचेच मन जिंकले आहे. या चिमुकल्याचे नाव विराट तंतुवाय असे असून तो इंदौरचा राहाणारा आहे. या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले त्यावेळी तर तो अवघा काही महिन्यांचा होता. त्याच्यासोबत त्याची आई सतत चित्रीकरणाला असते. तो लहानपणापासूनच कॅमेरा फ्रेंडली असल्याने त्याच्यासोबत चित्रीकरण करताना मालिकेच्या टीमला  खूपच सोपे गेले. विराटचे वडील डॉक्टर आहेत. त्यांच्या एका पेशंटनेच विराटचा फोटो पेशवा बाजीराव या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसमधील एका व्यक्तीला दाखवला होता. फोटो पाहाताच त्यांना तो इतका आवडला की त्यांनी लगेचच विराटचा व्हिडिओ मागवला आणि त्यानंतर फोटोशूटसाठी विराटला बोलावण्यात आले. आता तो या मालिकेचा भाग बनला आहे. त्याच्या या मालिकेसाठी त्याचे कुटुंबीय सध्या प्रचंड उत्सुक आहेत.