एका एपिसोडसाठी एक करोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 12:24 IST
झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनपासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस परीक्षकाची भूमिका साकारत आहे. जॅकलिनने खूपच कमी वर्षांत बॉलिवुडमध्ये ...
एका एपिसोडसाठी एक करोड
झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनपासून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस परीक्षकाची भूमिका साकारत आहे. जॅकलिनने खूपच कमी वर्षांत बॉलिवुडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. तिच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. जॅकलिनच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्याचे नेहमीच कौतुक केले जाते. जॅकलिनने तिच्या नृत्यावर खूपच मेहनत घेतली आहे. या सगळ्यामुळेच तिची निवड झलक दिखला जासाठी करण्यात आली. झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या एका भागासाठी जॅकलिन एक करोड रुपये घेते अशी चर्चा आहे. पण या केवळ अफवा असल्याचे जॅकलिनचे म्हणणे आहे. पैशांसाठी नव्हे तर मला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे असल्यामुळे मी हा कार्यक्रम स्वीकारला असे जॅकलिन सांगते.