OMG 'परदेस में है मेरा दिल'च्या सेटवर सहकलाकारानेच चोरला अर्जुन बिजलानीचा फोन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 17:01 IST
सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात आपण आपल्या मोबालइल फोन सोडून एकही दिवस राहू शकत नाही. फोन घरी विसरलो तरीही संपूर्ण दिवस ...
OMG 'परदेस में है मेरा दिल'च्या सेटवर सहकलाकारानेच चोरला अर्जुन बिजलानीचा फोन?
सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात आपण आपल्या मोबालइल फोन सोडून एकही दिवस राहू शकत नाही. फोन घरी विसरलो तरीही संपूर्ण दिवस कसा घालवणार हा विचारही करण कठीण? असाच प्रकार गडला 'परदेस में हे मेरा दिल या मालिकेत राघवची भूमिका साकारणारा अर्जुन बिजलानीबरोबर.शूटिंग दरम्यान अर्जुन बिजलानी त्याचा मोबाइल फोन व्हॅनिटी व्हॅन मध्ये ठेवून गेला आणि काही वेळानंतर परतल्यानंतर अर्जुनला व्हॅनिटीचा दरवाजा उघडा दिसला.घाबरून अर्जुनने त्याच्या सगळ्या गोष्टी जागेवरच आहे की नाही या गोष्टीचा शोध घेत असताना फक्त मोबाइल जागेवर नसल्याचे आढळले.त्यानंतर अर्जुनला काही सुचेना आणि वेळही वाया न घालता त्याने त्याचा मोबाईल फोनचा शोध घ्यायला सुरूवात केली.सगळीकडे अर्जुन धावाधाव करत फोन शोधतोय मात्र फोन काही अर्जुनला मिळेना.नंतर अर्जुनचे वाढणारे टेंशन पाहता त्याची सहकलाकार सोनिया रक्करनेच अर्जुनला त्याचा फोन परत केला.सहकलाकरांनी मिळून अर्जुनसह मस्करी करण्याचे ठरवले होते.कारण नेहमी अर्जुन त्याच्या खाजगी वेळेत नेहमी आपल्या सहकलाकारांसह फोनवरच नेहमी कनेक्ट असतो. अर्जुनसह घडलेल्या मस्करीवर तो म्हणाला की,मला माझा फोन जिथे ठेवला होता तिथे न दिसल्यामुळे मला थोडे टेंशन आले होते. खरोखरच आपण एक मिनिटही फोनशिवाय राहु शकत नाही याची प्रचिती आली. मी तर फोनविना एक दिवसही घालवणे कठीण आहे.आणि त्यात सोनिया तर विचारूच नका अगदी ड्रामा क्विन आहे.या सगळ्यांच्या नाटकीपणामुळे मला वाटलेच नाही की या सगळे मिळुन माझी फिरकी घेत आहेत.मात्र फोन मिळाल्यानंतर मला माझ्या वागण्यावर खूप हसू येत होते. या निमित्ताने का होईना एक वेगळी मजा मस्ती सेटवर झाल्याचे अर्जुनने सांगितले.