Join us
Daily Top 2Weekly Top 5

​OMG! इंडियन आयडल स्पर्धक मान्या नारंगचा सेक्स व्हिडिओ लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 14:36 IST

​इंडियन आयडल स्पर्धक मान्या नारंगचा सेक्स व्हिडिओ नुकताच लीक झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती नग्न अवस्थेत दिसत असून एक माणूस या व्हिडिओत तिच्यासोबत आहे. तो त्यांचे खाजगी क्षण व्हिडिओमध्ये कॅप्चर करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

इंडियन आयडल हा कार्यक्रम सध्या चांगलाच गाजत आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज एकाहून एक सरस आहेत. त्यामुळे यंदाचा इंडियन आयडलचा विजेता कोण असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. पण आता एका वेगळ्याच कारणाने हा कार्यक्रम चर्चेत आला आहे. इंडियन आयडलमधील रसिकांची लाडकी स्पर्धक मान्य नारंगचा एक सेक्स व्हिडिओ नुकताच लीक झाला आहे. हा व्हिडिओ अनेक साईट्स असून तो सोशल मीडियावरदेखील फिरत आहे. या व्हिडिओमध्ये ती संपूर्णपणे न्यूड अवस्थेत आहे. तसेच या व्हिडिओत एक माणूस दिसत असून तो त्यांचे खाजगी क्षण व्हिडिओमध्ये कॅप्चर करत आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. मान्याने असा व्हिडिओ शूट कसा केला आणि व्हिडिओमधील असलेली व्यक्ती कोण आहे असा प्रश्न हा व्हिडिओ पाहाणाऱ्यांना पडलेला आहे. तसेच ही खरेच मान्या आहे की मान्यासारखी दिसणारी कोणी मुलगी आहे अशीदेखील चर्चा रंगली आहे.  इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून मान्या ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली होती. तिचा आवाज तर प्रेक्षकांना खूप आवडतो. पण त्याचसोबत तिचे दिसणे, तिचे राहाणीमान हे प्रेक्षकांना आवडले होते. ऑडिशनला तर ती पंजाबी चुडा घालून आली होती. मान्या विवाहित असून तिच्या सासू-सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे ती इंडियन आयडल स्पर्धेत भाग घेऊ शकली असे तिने त्यावेळी सांगितले होते. इंडियन आयडल या कार्यक्रमात सोनू निगम, अन्नू मलिक आणि फराह खान परीक्षकाची भूमिका बजावत आहेत. या तिघांचीही मान्या खूपच लाडकी आहे. मान्याने आतापर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार आणि सर्रास गाणी सादर केली आहेत.