Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोठ मालिकेतील राधाच्या लग्नात बयो आजी आणणार विघ्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 17:40 IST

गोठ मालिकेच्या कथानकाला काहीच दिवसांमध्ये आता एक महत्त्वाचं वळण मिळणार आहे. राधा लग्नाची हळद लावून नव्या आयुष्याची स्वप्ने पाहात ...

गोठ मालिकेच्या कथानकाला काहीच दिवसांमध्ये आता एक महत्त्वाचं वळण मिळणार आहे. राधा लग्नाची हळद लावून नव्या आयुष्याची स्वप्ने पाहात आहे. मात्र तिचे लग्न होणार की नाही याची शंका आहे. कारण कायम तिचा तिरस्कार करणारी बयो आजी तिच्या लग्नात विघ्न आणणार आहे. आता राधा बयो आजीचे हे कारस्थान हाणून पाडणार की बयो आजीचा विजय होणार हे काहीच दिवसांत कळेल.स्त्रियांचे निर्णय स्त्रियांच्या हाती असा विचार गोठ ही मालिका मांडत आहे. नेहमीच्या पठडीतील मालिकांपेक्षा ही मालिका वेगळी असल्याने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. या मालिकेत सुरुवातीपासूनच राधाला त्रास देण्याचा बयो आजीने प्रयत्न केला आहे. पण तिचे सगळे प्रयत्न असफल झालेले आहेत. आता सर्वांपुढे राधाने केलेल्या आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी बयो आजीने एक मोठी विचित्र खेळी खेळली आहे. त्यासाठी तिने अभय म्हापसेकरला हाताशी धरले आहे. अभिषेकने राधाशी लग्न करू नये यासाठी त्याला फितवण्याचा डाव अभय खेळत आहे. त्याच्या या डावाला अभिषेक बळी पडतो का, बयो आजी अपमानाचा बदला घेते का, की सर्वांच्या खेळ्या हाणून पाडत राधाचे लग्न निर्विघ्न पार पडते हे पाहाणे रंजक ठरणार आहे. या मालिकेत नीलकांती पाटेकर, राजन भिसे, समीर परांजपे, रुपल नंद, सुशील इनामदार, विवेक गोरे, ऋता काळे, सुप्रिया विनोद, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नीलकांती पाटेकर या मालिकेद्वारे कित्येक वर्षांनंतर अभिनयाकडे वळल्या आहेत.