न.स.ते. उद्योगच्या सेटवर करणार आदर्श शिंदे आणि अमित राज सुरांची बरसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 14:47 IST
विशिष्ट विनोदांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या झी टॉकीजच्या नसते उद्योग या चॅट शोमध्ये सध्या प्रेक्षक एक चांगला बदल अनुभवत ...
न.स.ते. उद्योगच्या सेटवर करणार आदर्श शिंदे आणि अमित राज सुरांची बरसात
विशिष्ट विनोदांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या झी टॉकीजच्या नसते उद्योग या चॅट शोमध्ये सध्या प्रेक्षक एक चांगला बदल अनुभवत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील मराठी सिनेमाला महत्त्व देऊन त्याला एक मोठं व्यासपीठ देण्यासाठी झी टॉकीजने हे अनोखे पाऊल उचलले आहे. मराठी चित्रपटांना घराघरात पोहोचवणारी झी टॉकीज ही वाहिनी आता आगामी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीदेखील मोलाचा वाटा उचलत आहे.झी टॉकीजवरील लोकप्रिय कार्यक्रम "न.स.ते. उद्योग" मध्ये येत्या २५ मार्च रोजी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व सुप्रसिद्ध संगीतकार अमित राज हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदक प्रसाद ओक आणि क्रांती रेडकर हे आपल्या नेहमीच्या खास शैलीत या दोन मान्यवर गायक - संगीतकारांसोबत गप्पा मारत त्यांच्या जीवनातील अनेक अव्यक्त गोष्टी प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. "देवा तुझ्या गाभाऱ्याला" या दुनियादारीमधील प्रचंड गाजलेल्या गाण्यापासून आदर्श व अमित यांचा गायक - संगीतकार म्हणून एकत्र प्रवास सुरु झाला. प्रल्हाद शिंदे व आनंद शिंदे यांच्या गायकीचा वारसा निर्विवादपणे पुढे घेऊन जात असलेला आदर्श आणि स्वकर्तृत्वावर मराठी सिनेसृष्टीमध्ये आपलं नाव आघाडीच्या संगीतकारांमध्ये नेऊन ठेवणारा अमित यांच्या मैत्रीचे मजेदार किस्से या विशेष भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. स्टुडिओमध्ये एकत्र आल्यावर दर्जा गाण्यांची सुरावट पेरणारी ही जोडगोळी त्यांच्या खाजगी आयुष्यात नेमकी कशी आहे? आदर्श आणि अमित एकमेकांना नेमके किती ओळखतात? विशाखा सुभेदार, कमलाकर सातपुते आणि प्रभाकर मोरे यांनी सादर केलेल्या धमाल विनोदी स्किटवर आदर्शची नेमकी काय प्रतिक्रिया आली? प्रसाद ओकने अमित राजला किशोर कुमार यांचं कोणतं गाणं गायला सांगितलं?