आता कपिलही मेणाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 19:25 IST
जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे तुम्हाला ठाऊक आहेच. पण आता तुमचा ...
आता कपिलही मेणाचा...
जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे तुम्हाला ठाऊक आहेच. पण आता तुमचा आमचा लाडका कॉमेडियन कपिल शर्मा याचा मेणाचा पुतळाही मादाम तुसाँचे सौंदर्य वाढवणार आहे. मादाम तुसाँमध्ये स्थान मिळालेला कपिल हा भारतीय टीव्ही जगतातील पहिला कलाकार आहे. मादाम तुसाँच्या ज्या टीमने मेणाच्या पुतळ्यासाठी मोदींचे मेजरमेंट घेतले, त्याच टीमने कपिलचेही मेजरमेंट घेतले.