गौरी आणि हितेनने अनेक मालिकांमध्ये एकत्र काम करण्यासोबतच नच बलिये यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील ते एकत्र झळकले होते. आता ते पुन्हा एकदा रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. बिग बॉसमध्ये आतापर्यंत अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. शिल्पा सकलानी आणि अपूर्व सकलानी या पती-पत्नीच्या जोडीने देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. एखादी जोडी कार्यक्रमात असली की कार्यक्रमाला अधिक तडका मिळतो आणि टीआरपी चांगलाच वाढतो असे म्हटले जाते. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये गौरी आणि हितेनला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारण्यात आले आहे. त्यामुळे गौरी आणि हितेन दोघेही कार्यक्रमात झळकणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता गौरी आणि हितेनपैकी केवळ हितेनच बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. कारण गौरी सध्या तू आशिकी या कलर्स वाहिनीवरील मालिकेमध्ये काम करत आहे. त्यामुळे या मालिकेच्या चित्रीकरणातून तिला ब्रेक मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह असल्याने गौरी बिग बॉसमध्ये सहभागी होणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही. पण हितेन या कार्यक्रमात भाग घेणार असल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलाच आनंद होणार आहे यात काही शंकाच नाही आणि त्यात जर गौरी देखील बिग बॉसच्या घरात झळकली तर त्यांचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.
Also Read : बिग बॉसमधील कॉन्ट्रोव्हर्शल स्पर्धक