महाभारत या मालिकेत शकुनीची भूमिका साकारलेला अभिनेता प्रणित भट्टची संयुक्त या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे. प्रणितने साकारलेली शकुनीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेच्या लोकप्रियतेनंतर प्रणितला अनेक मालिकांच्या आॅफर्स मिळाल्या. बिग बॉस या कार्यक्रमातही तो स्पर्धक म्हणून झळकला होता. प्रणितने साकारलेला खलनायक चांगलाच प्रसिद्ध झाला होता. खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर आता तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तो पहिल्यांदाच एक सकारात्मक भूमिका साकारणार आहे. संयुक्त या मालिकेत इलाच्या भावाच्या भूमिकेत तो आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रणितची मालिकेत एंट्री झाल्यानंतर या मालिकेच्या कथानकाला अनेक वळणे मिळणार आहेत. हा खलनायक प्रेक्षकांना नायक म्हणून आवडतो की नाही हे काही दिवसांतच कळेल.
खलनायक नव्हे नायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:20 IST