Join us
Daily Top 2Weekly Top 5

'होणार सून मी..' नव्हे तर 'ही' होती तेजश्रीची पहिली मालिका; तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 19:43 IST

Tejashree Pradhan: तेजश्रीने अन्य दुसऱ्याच एका मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलंय. याविषयी फार मोजक्या लोकांना ठावूक आहे.

'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan).  या मालिकेत तिने साध्या, सोज्वळ, समजूतदार सुनेची केलेली भूमिका विशेष गाजली होती. इतकंच नाही तर जान्हवी म्हणूनच आज अनेक जण तिला ओळखतात. काहींच्या मते, होणार सून ही तेजश्रीची पहिलीच मालिका आहे. मात्र, तसं अजिबात नसून तेजश्रीने अन्य दुसऱ्याच एका मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलंय. याविषयी फार मोजक्या लोकांना ठावूक आहे.

'होणार सून..' ही तेजश्रीची पहिली मालिका नसून तिने यापूर्वी एका गाजलेल्या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेत तिला अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. १० वीची परिक्षा झाल्यानंतर तेजश्रीने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स केला होता. याच काळात ती अभिनयदेखील शिकली. 

कॉलेजमध्ये असताना तेजश्रीला तिची पहिली मालिका मिळाली. २००३ साली तिने 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेत काम केलं. हीच तेजश्रीची पहिली मालिका होती. या मालिकेत तिने छोटेखानी भूमिका साकारली होती.  दरम्यान, ह्या गोजिरवाण्या घरातनंतर तेजश्री अनेक मालिकांमध्ये झळकली. अग्ग्बाई सासूबाई, होणार सून मी या घरची, ती सध्या काय करते, झेंडा अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 

टॅग्स :तेजश्री प्रधान सेलिब्रिटीटेलिव्हिजन