Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोरा फतेहीला मिळाले 'चांगले' फ्रेंड्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:36 IST

बिग बॉगसारख्या रिअँलिटी शोमधून मला 'खूप चांगले' फ्रेंड्स मिळाले आहेत, असे नोरा सांगत आहे. जिथे अनेक सेलिब्रिटीज केवळ फाईट ...

बिग बॉगसारख्या रिअँलिटी शोमधून मला 'खूप चांगले' फ्रेंड्स मिळाले आहेत, असे नोरा सांगत आहे. जिथे अनेक सेलिब्रिटीज केवळ फाईट करण्यात व्यस्त आहेत. त्या ठिकाणी नोराने आपल्याला चांगले फ्रेंड्स मिळाल्याचे म्हटले आहे. नोराला वाइल्डकार्ड एन्ट्री मिळाली होती. कमी कालावधी असला तरी ही माझ्यासाठी एक संधी होती. मला याचा आनंद होता की, मी माझ्यातले टॅलेंट या ठिकाणी दाखवू शकले. विशेषत:माझ्यात असलेले डान्सचे टॅलेंट मला सादर करता आले. मी खूप दंगा, मस्ती करत सकारात्मक दृष्टीने सगळ्य़ा उपक्रमात सहभागी झाल्याचे ती सांगते. अभिनेता सुयश रायदेखील तिच्याप्रमाणेच १२ आठवड्यांचा कालावधी पूर्ण करून बाहेर पडला आहे. इतरांच्या तुलनेत नोरा आणि सुयशला कमी व्होटिंग झाल्याने बाहेर पडावे लागले आहे.हृषभ सिन्हा, मंदना करिमी, केथ सिक्वेरिया आणि प्रिन्स नरुला प्रमाणे या दोघांनाही कमी मतांमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. प्रिन्स, किश्‍वर र्मचंट अणि सुयश हे खूप चांगले मित्र मला बिग बॉसमध्ये मिळाले. प्रिन्स या सिझनचा विजेता ठरेल, असेही नोराने म्हटले आहे. बिग बॉसच्या घरात नोरा केवळ तीन आठवडे होती.