Join us

गणपती बाप्पा मोरयामध्ये ​अश्विनी एकबोटेची जागा कोणीही घेणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 16:18 IST

अभिनेत्री अश्विनी एकबोटेचे नुकतेच हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अश्विनी सध्या काही नाटकांमध्ये काम करत होती. तसेच गणपती बाप्पा मोरया ...

अभिनेत्री अश्विनी एकबोटेचे नुकतेच हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अश्विनी सध्या काही नाटकांमध्ये काम करत होती. तसेच गणपती बाप्पा मोरया या मालिकेत रावणाची आई कैकसीची भूमिका ती साकारत होती. तिने या मालिकेचे चित्रीकरण 21 तारखेला केले आणि त्यानंतर तिच्या कार्यक्रमासाठी ती पुण्याला गेली. दुसऱ्या दिवशी परत येऊन ती चित्रीकरणाला पुन्हा रुजू होणार होती. पण 22 तारखेला तिच्या निधनाची बातमी सगळ्यांना मिळाली. 23 तारखेला सेटवर न येता तिने कायमचीच एक्झिट घेतली. गणपती बाप्पा मोरया या मालिकेच्या टीमला अश्विनीच्या जाण्याने चांगलाच धक्का बसला आहे. या मालिकेच्या सगळ्या टीमने मिळून यंदा सेटवर दिवाळी साजरी करायची नाही असेच ठरवले आहे. तसेच या मालिकेत अश्विनीची जागा कोणीही घेणार नसून ती साकारत असलेल्या भूमिकेला निरोप देण्यात येणार असल्याचे प्रोडक्शन टीम आणि वाहिनीने ठरवले आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेच्या सेटवर गणपतीत कंदिल लावण्यात येते. तसेच रोषणाई करण्यात येते. पण यावर्षी या  मालिकेच्या सेटवर दिवाळी साजरीच केली जाणार नाहीये. अश्विनी गेल्यानंतर ही दिवाळी साजरी करायची नाही असा मालिकेच्या कलाकारांनी आणि संपूर्ण टीमने एकमताने निर्णय घेतला आहे. तसेच या मालिकेत अश्विनीने कैकसीची भूमिका एका उंचीवर नेवून ठेवली आहे. त्या इमेजला कोणताही धक्का पोहोचू नये यासाठी कैकसीची भूमिका मालिकेत यापुढे दाखवलीच जाणार नाही. कैकसीमाता भूतलावर निघून गेल्या आहेत असे मालिकेत दाखवण्यात येईल. खरे तर कथानकानुसार या व्यक्तिरेखेचा शेवट काही महिन्यांनी होणार होता. पण आता कथानक बदलण्यात आले आहे.