Join us
Daily Top 2Weekly Top 5

मयूरेश पेम हा साकारणार नितीन तेंडूलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 14:27 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या जीवनावर आधारित असलेला सचिन अ बिलीअन ड्रीम्स या हॉलिवुड चित्रपटात आपला मराठमोळी चेहरा असलेला ...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या जीवनावर आधारित असलेला सचिन अ बिलीअन ड्रीम्स या हॉलिवुड चित्रपटात आपला मराठमोळी चेहरा असलेला मयूरेश पेम हा कलाकार सचिनच्या मोठया भावाची म्हणजेच नितीन तेंडूलकरची भूमिका साकारणार आहे. मयूरेशची नुकतीच संस्कृती कलादर्पण पुरस्काराच्या चार नामांकनासाठी निवडदेखील झाली होती. मयूरेश हे नाव मराठी इंडस्ट्रीसाठी काय नवे नाही. पण मयूरेशला मिळालेल्या हया सोनरी संधीचा फायदा नक्कीच मराठी इंडस्ट्रीसाठी अभिमान वाटण्यासारखे आहे. हा चित्रपट हॉलिवुडचे दिग्दर्शक जेम्स एरस्कीन यांनी केले आहे. हॉलीवुडचे हे प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्यांनी यापूर्वी दहा चित्रपट क्रीडासंबंधी केले आहे. चला तर, मयूरेशच्या या नवीन वाटचालीसाठी लोकमत सीएनएक्सच्या शुभेच्छा.