Join us

निखिल चव्हाणची या अभिनेत्रीसोबत जमली जोडी! लवकरच बांधणार लग्नगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 17:33 IST

Nikhil Chavan : अभिनेता निखिल चव्हाण सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता निखिल चव्हाण सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आता तो कोणासोबत लग्न करतोय, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना. आम्ही तुम्हाला सांगतो. निखिल चव्हाण लवकरच अभिनेत्री अनुष्का सरकटेसोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जातं आहे. 

निखिल चव्हाण गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री अनुष्का सरकटेला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांनी झी मराठीच्या कारभारी लयभारी या मालिकेतून एकत्र काम केलं होतं. २०२० साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर जवळपास दीड वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले पाहायला मिळाले होते. या मालिकेनंतर निखिल आणि अनुष्का दोघे एनेकदा एकत्र पाहायला मिळाले. यावरून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत असे म्हटले जात होते.

दरम्यान, नुकताच अनुष्काने तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी निखिलने सोशल मीडियावर त्या दोघांचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, हॅप्पी बर्थडे खतरनाक अनुष्का. त्याच्या या पोस्टनंतर पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते लग्नाची घोषणा कधी करतात, याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

वर्कफ्रंटनिखिल चव्हाणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या तो देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट' नाटकात काम करतो आहे. याशिवाय निखिल अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर 'तू तू मी मी' या नाटकातही रंगभूमी शेअर करतो आहे. तसेच लवकरच त्याचा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर अनुष्काने तुझीच रे मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती कारभारी लयभारी मालिकेत झळकली. या मालिकेतून तिला चांंगलीच लोकप्रियता मिळाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nikhil Chavan and Actress to Marry Soon?

Web Summary : Actor Nikhil Chavan is rumored to marry actress Anushka Sarkate, his co-star from 'Karbhari Laybhari.' Their on-screen chemistry sparked dating rumors, fueled by recent social media posts. Nikhil is currently involved in plays like 'All the Best' and 'Tu Tu Me Me,' while Anushka debuted in 'Tujhich Re' and gained fame from 'Karbhari Laybhari.'
टॅग्स :निखील चव्हाण