Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरीच्या सेटवर आला नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 18:07 IST

दुहेरी या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना काही दिवसांपूर्वी एक पाहुणा अचानक या मालिकेच्या सेटवर आला आणि आता हा पाहुणा ...

दुहेरी या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना काही दिवसांपूर्वी एक पाहुणा अचानक या मालिकेच्या सेटवर आला आणि आता हा पाहुणा या मालिकेच्या टीममधील सगळ्यांचा जीव की प्राण बनला आहे. मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना एक कासवाचे पिल्लू स्पॉटबॉयला दिसले. त्याने लगेचच ते निवेदिता जोशी यांच्याकडे आणून दिले. आत कित्येक दिवस झाले तरी हे पिल्लू सेटवरच असून सगळे या पिल्लूची काळजी घेत आहेत. या मालिकेत मैफिलीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या उर्मिला निंबाळकरला तर प्राण्यांविषयी प्रचंड प्रेम आहे. ती सध्या चित्रीकरणाच्या दरम्यान ब्रेक मिळाल्यास त्याच्याशीच खेळण्यात दंग असते असे कळतेय.