Join us  

'तू तेव्हा तशी'मध्ये कॉलेजमध्ये हरवलेला पट्या अनामिकाला पुन्हा सापडणार, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 1:43 PM

सौरभच्या घरी जे पाच लाख आलेले आहेत त्यातून वल्ली दागिन्यांची खरेदी करते. ते दागिने खोटे आहेत हे अनामिका सांगते. आता ते पाच लाख परत आणण्यासाठी सौरभ मधला पट्या जागा होतो आ

स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘तू तेव्हा तशी’ ( Tu Tevha Tashi ) ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली.चाळीशी पार केलेल्या सौरभ आणि अनामिकाची फ्रेश व युथफूल प्रेमकहाणी या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळतेय.. या मालिकेतील पट्या आणि अनामिकाची अव्यक्त प्रेम कहाणी हळुवार फुलताना प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. या मालिकेतील सौरभ म्हणजेच स्वप्नील जोशी आणि अनामिका म्हणजेच शिल्पा तुळसकर यांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांची जोडी देखील प्रेक्षकांना आवडली आहे.

आता या मालिकेत प्रेक्षक पाहू शकतील कि सौरभच्या घरी जे पाच लाख आलेले आहेत त्यातून वल्ली दागिन्यांची खरेदी करते. ते दागिने खोटे आहेत हे अनामिका सांगते. आता ते पाच लाख परत आणण्यासाठी सौरभ मधला पट्या जागा होतो आणि सर्वसामान्य माणसांची फसवणुक करणाऱ्यांना धडा शिकवलाच पाहिजे हे सौरभ मनाशी ठरवतो. त्या सोनाराच्या दुकाना बाहेर आपल्याला गर्दी दिसते अनेकांची फसवणुक झालेली आहे.

त्या फसवणूक करणाऱ्या माणसांना धडा शिकवण्यासाठी सौरभ पंजाबी माणसाचं रूप घेतो आणि त्या माणसांना शोधून चांगला चोप देतो. सौरभच्या या पंजाबी लूकमुळे प्रेक्षकांची हा भाग बघण्याची उत्सुकता खूप वाढली आहे. स्वप्नीलने या पंजाबी लुकमधील फोटोज सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहे. चाहत्यांचा या फोटोला आणि स्वप्निलच्या या पंजाबी लुकला तुफान प्रतिसाद मिळतोय.

टॅग्स :स्वप्निल जोशीटिव्ही कलाकार