Join us

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवीन ट्विस्ट, अखेर कार्तिक सांगणार दीपाला हे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 17:46 IST

Rang Maza Vegla:'रंग माझा वेगळा' ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे. अखेर कार्तिक दीपाला त्याचे सत्य सांगणार आहे. त्यानंतर कार्तिक आणि दीपा पुन्हा एकत्र येतील का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात पाहायला मिळाले की, होळी सणाच्या निमित्ताने सौंदर्या दीपाला ईनामदारांच्या बंगल्यात राहण्यासाठी सांगते. त्यामुळे दीपा आणि कार्तिकी ईनामदारांच्या घरी होळी आणि धुळवड साजरी करणार आहेत. नेहमीप्रमाणे श्वेता दीपाच्या बाबतीत कट रचते. तिच्या ड्रिंकमध्ये ती काहीतरी मिसळवून देते. त्यामुळे दीपा विचित्र वागू लागते. ती कार्तिकला रंग लावते आणि त्याच्या हातून स्वतःला रंग लावून घेते. हे सर्व पाहून आयशा भडकते.

तर दीपा कार्तिकच्या खोलीत त्याच्या फोटोकडे पाहून हसत असते. तितक्यात कार्तिकही तिथे येतो. तेव्हा दीपा त्याला तू तिच्यासोबत नाचत होता, ते मला आवडले नाही असे सांगते. त्यांच्या चर्चांमध्ये कार्तिक दीपाला सांगतो की तो कधीच बाप होऊ शकत नाही. हे सगळं रुममध्ये ठेवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड होते. आता हा कॅमेरा कोणाच्या हाती लागतो आणि त्यानंतर काय घडते, तसेच यानंतर दीपा कार्तिक पुन्हा एकत्र येतील का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह