Join us  

‘ललित २०५’ मध्ये धक्कादायक वळण, नील - भैरवीच्या नात्यात येणार दुरावा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 4:49 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. 'ललित २०५'च्या हरवलेल्या पुस्तकाचा शोध सुरु असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.

ठळक मुद्दे ‘ललित २०५’ वरील संकटांच्या मालिकेत आणखी पडणार भर

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. 'ललित २०५'च्या हरवलेल्या पुस्तकाचा शोध सुरु असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या व्यक्तीच्या येण्याने ‘ललित २०५’ वरील संकटांच्या मालिकेत आणखी भर पडणार आहे. 'ललित २०५' साठी नवे संकट म्हणून उभी ठाकणारी ती व्यक्ती आहे पल्लवी.

पल्लवीच्या येण्याने नील आणि भैरवीच्या नात्यातही ठिणगी पडणार आहे. पल्लवी आणि नीलचे नेमके नाते काय? या कठीण काळात भैरवीला आजीचा साथ मिळणार का? पल्लवीच्या मनसुब्यांचा छडा लावण्यात भैरवीला यश मिळणार का? नील आणि भैरवीच्या नात्याचे भविष्य काय? या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे 'ललित २०५'च्या पुढील भागांमध्ये मिळणार आहेत. पल्लवीच्या भूमिकेत कोण नायिका पाहायला मिळणार हे अद्याप समजू शकलेले नाही. पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मने जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचे चित्रण या मालिकेत करण्यात आले आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणे  दुर्मीळ होत आहे. या पार्श्वभूमीवर आधारीत ही मालिका आहे.  'ललित २०५'मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. 

 

टॅग्स :ललित 205संग्राम समेळ