Join us

एकरूप एका नव्या रूपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 09:58 IST

सुहानी सी एक लडकी, विषकन्या यांसारख्या मालिकेत काम केलेली एकरूप बेदी आता एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ...

सुहानी सी एक लडकी, विषकन्या यांसारख्या मालिकेत काम केलेली एकरूप बेदी आता एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. पहिल्यांदाच ती एका ऐतिहासिक मालिकेत झळकणार आहे. बालाजी टेलिफ्लिम्सच्या चंद्र-नंदिनी या मालिकेत श्वेता प्रसाद बासू आणि रजत टोकस प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेत श्वेताची  मैत्रीण म्हणून एकताची एंट्री होणार आहे. नंदिनीची सगळ्यात जास्त विश्वासू असलेल्या किन्नरीची व्यक्तिरेखा एकरूप साकारणार आहे. काही भागांनंतर तर ती नंदिनीसोबत रणभूमीवर युद्ध करतानाही आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेविषयी एकरूप सांगते, "या मालिकेतील माझी वेशभूषा, ज्वेलरी यांच्या मी प्रेमात पडले आहे. ही भूमिका साकारण्याासाठी मी खूपच उत्सुक आहे."