Join us

मोना सिंगने अभिनेता नाही तर एका बँकरसोबत केलं लग्न, शेअर केला पहिला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:12 IST

काही तासातच फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

जस्सी जैसी कोई नहीं ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग लग्नाच्या बेडीत अडकली आहे.  27 डिसेंबरला तिने आपल्या बॉयफ्रेंड श्यामसोबत सातफेरे घेतले. लग्नानंतरचा आपल्या पतीसोबतचा पहिला सेल्फि मोनाने आपल्या फॅन्ससाठी शेअर केला आहे. या फोटोत मोना सिंपल पण खूप सुंदर दिसतेय. सेल्फि घेताना मोनाच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोत दिसतो आहे. सध्या या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मोनाचे फॅन्स तिला लग्नाच्या शुभेच्छा देतायेत.  

अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मोनाचा लग्नसोहळा पार पडला. अगदी जवळचे मित्र आणि कुटुंबीय एवढेच या लग्नाला हजर होते. मोनाच्यानव-याबद्दल सांगायचे झाल्यास तो साऊथ इंडियन बँकर आहे. मोनाला ‘जस्सी जैसी कोई नहीं’या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर क्या हुआ तेरा वादा, प्यार को हो जाने दो व कवच खाली शक्तियों से या मालिकेत ती दिसली.

मोना सिंग लवकरच आमीर खान व करीना कपूरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये झळकणार आहे. याशिवाय सध्या एकता कपूरच्या एका वेबसीरिजमध्येही ती काम करतेय. मोनाच्या लग्नासाठी या वेबसीरिजच्या शूटींगचे वेळापत्रक बदलण्यात आले होते. लग्नासाठी शूटींग शिफ्ट बदलण्याची विनंती मोनाने केली होती. त्यानुसार, हे बदण्यात आले आणि मोनाने शूटींग पूर्ण केले.

 

टॅग्स :मोना सिंग