Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, त्याचं आहे जयदीप फेम मंदार जाधवशी खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 17:59 IST

Rang Maza Vegla : रंग माझा वेगळामध्ये लीप आला असून मालिकेचे कथानक १४ वर्षांनी पुढे सरकले आहे. या १४ वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा(Rang Maza Vegla)मध्ये लीप आला असून मालिकेचे कथानक १४ वर्षांनी पुढे सरकले आहे. या १४ वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. साक्षीच्या न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली कार्तिक १४ वर्षांचा तुरुंगवास भोगून आला आहे. तर दीपिका कार्तिकीही आता मोठ्या झाल्या आहेत. लवकरच मालिकेत दीपिका कार्तिकीचा खास मित्र आर्यनची एन्ट्री होणार आहे. अभिनेता मंदार जाधवचा भाऊ मेघन जाधव आर्यन ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मेघन म्हणाला की, 'मी हिंदी मध्ये बरंच काम केलं आहे. पण माझ्या करियरची सुरुवात मराठी सिनेमानेच झाली. रंग माझा वेगळा ही  माझी मराठीतील पहिली मालिका आहे. आर्यन ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. या भूमिकेला दोन शेड्स आहेत. तो मनाने चांगला आहे मात्र तो एका मिशनवर आला आहे. आर्यन कुणाच्या सांगण्यावरून हे करतोय हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. 

तो पुढे म्हणाला की, माझा भाऊ मंदार जाधव माझ्या या नव्या प्रोजेक्टसाठी खुपच उत्सुक आहे. स्टार प्रवाहसोबत मी काम करावं अशी त्याची इच्छा होती जी आता पूर्ण होतेय. गेल्या काही वर्षात स्टार प्रवाहने ज्या पद्धतीने दर्जेदार मालिका सादर करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे या प्रवाहात सामील होताना अत्यानंद होत आहे. 
टॅग्स :स्टार प्रवाह