Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नेहा पेंडसेने मान्य केले तिच्या ब्रेकअपबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2017 17:40 IST

मे आय कम इन मॅडम या मालिकेत सध्या नेहा पेंडसे महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नेहाचे गेल्या तीन महिन्यात तब्बल ...

मे आय कम इन मॅडम या मालिकेत सध्या नेहा पेंडसे महत्त्वाची भूमिका साकारत आहे. नेहाचे गेल्या तीन महिन्यात तब्बल सात किलो वजन वाढले आहे आणि ते कशाप्रकारे कमी करावे हेच तिला कळत नाहीये. यामुळे ती सध्या चांगलीच टेन्शनमध्ये आली आहे. याविषयी नेहा सांगते, "मी माझे वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. पण काही केल्या माझे वजन कमी होत नाहीये. मी डाएटदेखील केला. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता नुकत्याच मी काही वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. त्यात माझ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मनावरील ताणामुळे असे घडते असे मला सांगण्यात आले. कॅमेऱ्यावर तर माझे वाढलेले वजन लगेचच दिसून येत आहे आणि त्यातही मे आय कम इन मॅडम या मालिकेत मी एक मॉडर्न मुलगी दाखवली असल्याने मला पाश्चिमात्य कपडे घालावे लागतात. या कपड्यांमध्ये तर माझे वाढलेले वजन पटकन दिसून येत आहे. माझ्या अनेक चाहत्यांनी मला या गोष्टीविषयी सांगितले आहे. पण आता काहीही करून वजन कमी करायचे असे मी ठरवले आहे आणि त्यासाठी मी आता ध्यानधारणा करायला सुरुवात केली आहे. कारण तुमच्या मानसिक आरोग्यकडेदेखील तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे. पण त्यातूनही वजन कमी करायला किती अवधी लागणार हे मला माहीत नाही. मी मानसिक तणावातून जात असल्याने माझ्या आरोग्यावर त्याचा परिणाम झाला आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी माझे माझ्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाले. आमच्या दोघांमधील नाते खूप छान होते. तो एनआरआय असल्याने मी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णयदेखील घेतला होता. पण अखेरच्या क्षणी त्याने माघार घेतली. मी अभिनेत्री असल्याने मी नेहमीच माझ्या करियरला प्राधान्य देणार आणि त्यामुळे मी एक चांगली गृहिणी होऊ शकणार नाही असे त्याचे मत होते. आता त्याचे लग्नदेखील झाले आहे. मी या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी गेली दीड वर्ष स्वतःला कामात झोकून दिले होते. पण याचाच माझ्या तब्येतीवर परिणाम झाला. कोणत्याही व्यक्तिसाठी बदलायचे नाही असे मी ठरवले असून मला भविष्यात लग्न करायचे आहे. पण माझ्या पतीने मला समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे."