Join us

'बालिका वधू' फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल, प्रेग्नंसीत अडचण येत असल्याने उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 11:08 IST

लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्रीने गरोदर राहिली आहे.

'बालिका वधू' (Balika Vadhu) फेम अभिनेत्री नेहा मर्दाला (Neha Marda) प्रेग्नंसीत अडचण येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर अभिनेत्री गरोदर राहिली. मात्र काही कॉम्प्लिकेशन्समुळे तिला पुढील दोन दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली राहावं लागणार आहे.

अभिनेत्री नेहा मर्दाने 2012 साली आयुष्मान अग्रवालसह लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 10 वर्षांनंतर तिने गोड बातमी दिली. नेहा म्हणाली होती, 'आई होणार असल्याचं कळताच मला खूप आनंद झाला. गेल्या काही वर्षांपासून आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो. अनेकांनी मला टोमणेही मारले. पण आता ही बातमी देताना मला खूप आनंद होत आहे.'

माध्यम रिपोर्टनुसार, नेहा प्रेग्नंसीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. काही अडचणींमुळे तिला तात्काळ रुग्णालयाच दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. आणखी दोन दिवस तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली राहावं लागणार आहे.

'बालिका वधू'मध्ये नेहाने भूमिका साकारली होती. इथूनच ती प्रकाशझोतात आली. नेहा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच तिने मॅटर्निटी फोटोशूट पोस्ट केले होते. 

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसीहॉस्पिटल