Join us  

अखेर झाले नेहा कक्कर व आदित्य नारायणचे लग्न...! विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 11:42 AM

आदित्य-नेहू की शादी...

ठळक मुद्देअगदी काही दिवसांपूर्वी  नेहा आमच्या घरची सून झाली तर मला आनंदच आहे, असे उदित नारायण म्हणाले होते.

बॉलिवूडची सुपरस्टार सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा होती. इंडियन आयडल 11 च्या सेटवर  नेहा-आदित्यचे कुटुंबीय एकमेकांना भेटले, लग्नाची बोलणी झाली, तारीखही ठरली. पण हे लग्न होणार त्याचपूर्वी असे काहीही नसल्याची बातमी आली की, चाहत्यांची निराशा झाली. पण  हे लग्न झालेय. होय, पुराव्यादाखल नेहू व आदित्यच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.या व्हिडीओत नेहा कक्करआदित्य नारायण एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहे. व्हिडीओत आदित्यच्या हातात वरमाला आहे. भटजी आहेत. सप्तपदीचीही तयारी दिसतेय. बाजूला इंडियन आयडलचे स्पर्धक आणि अन्य जजेसही दिसत आहेत. अर्थात हे लग्न इंडियन आयडल 11 या शोचा एक भाग आहे.

हे सगळे कशासाठी तर शोचा टीआरपी वाढवण्यासाठीच. कारण गेल्या अनेक दिवसांपासून शोमध्ये लग्नाचा फॉर्मेट सुरु आहे. सुरूवातीला नेहू व आदित्य खरच लग्न करणार, असे चाहत्यांना वाटले. पण याचदरम्यान आदित्यचे वडील उदित नारायण यांनी हे लग्न, लग्नाच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचा खुलासा केला होता.

अगदी काही दिवसांपूर्वी  नेहा आमच्या घरची सून झाली तर मला आनंदच आहे. नेहा व आदित्यचे लग्न झाले तर आमच्या घरात एक फिमेल सिंगर घरात येईल, यापेक्षा दुसरा मोठा आनंद कुठला असू शकतो, असे उदित नारायण म्हणाले होते. पण अलीकडे त्यांनी नेहा त्यांच्या घरची सून होणार नसल्याचे म्हटले होते.

नेहा कक्कर आणि आदित्य यांच्या लग्नाच्या चर्चा फक्त अफवा आहेत.   इंडियन आयडॉल शोचा टीआरपी वाढवण्यासाठी या सगळ्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. कारण या शोमध्ये नेहा जज  आहे तर आदित्य होस्ट आहे. आदित्य माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. नेहासोबत त्याच्या लग्नाच्या चर्चा जर ख-या असत्या तर मला नक्की आनंद झाला असता. नेहा एक चांगली मुलगी आहे. तिला आमच्या घरची सून म्हणून स्वीकारायला मला नक्कीच आनंद होईल. पण या सर्व गोष्टी केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठी पसरवण्यात आल्या होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :नेहा कक्करआदित्य नारायणइंडियन आयडॉल