Join us  

बिग बॉस मराठी २ : नेहा आणि हिनाच्या कॅप्टनसीला या सदस्यांचा आहे विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 12:47 PM

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांवर “एक डाव भुताचा” हे साप्ताहिक कार्य सोपवले.

ठळक मुद्देवैशाली सेफमध्ये न जाऊ शकल्याने ती कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडली.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉसनी घरातील सदस्यांवर “एक डाव भुताचा” हे साप्ताहिक कार्य सोपवले. ज्यामध्ये टीम A - रुपाली, नेहा, हिना आणि माधव तर टीम B - वैशाली, शिव, वीणा, अभिजीत केळकर आहेत आणि किशोरी शहाणे या कार्याच्या संचालिका आहेत... भूत असलेल्या टीमने काळे कपडे घालायचे आहेत आणि शिकारी असलेल्या टीमने पांढरे कपडे. काल वीणा, अभिजीत आणि शिव सेफमध्ये गेले तर वैशाली सेफमध्ये न जाऊ शकल्याने ती कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडली...अभिजीत, वीणा आणि शिवचे असे म्हणणे पडले नेहा आणि हिनाला काही करून कॅप्टन नाही होऊ द्यायचे.  आता आजच्या भागमध्ये काय होणार ? टीम B मधील कोणता सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर जाणार ? कोण जिंकणार ? काय काय खलबत रचली जाणार ? टीम A च्या बाहुल्या कुठे कुठे लपवल्या जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

आजच्या भागामध्ये अभिजीत, वैशाली आणि शिव यांच्यामध्ये टीम A च्या बाहुल्या कुठे कुठे लपवता येऊ शकतील याबद्दल गहन चर्चा रंगणार आहे... ज्यामध्ये अभिजीतचे म्हणणे आहे मी कालच विचार करून ठेवला आहे त्यांच्या बाहुल्या आपण कुठे कुठे लपवू शकतो...  अभिजीतने हेच शिव आणि वैशालीला सांगितले कॅमेराच्या वरती, तुळशीच्या खाली खड्डा आहे तिथे लपवू शकतो... आता बघूया यांनी लपवलेल्या बाहुल्या टीम A शोधू शकतील का ?

माधव किशोरीताई आणि नेहाबरोबर चर्चा करत आहे कि, अभिजीतने मला विचारले तुझ्याकडे दोन पांढऱ्या पॅन्ट आहेत का ? माझ्याकडे एक ट्राऊसर आहे पण मी ती नाही देणार... अजून एक आहे जी मी घातली आहे पण ती खराब झाली आहे... त्यावर अभिजीतचे म्हणणे होते माझी इतकी धावपळ नाहीये, तर माधव म्हणाला माझी तरी कुठे होती धावपळ काल पण झालीच ना खराब ... माधव म्हणाला खराब नाही होणार असे म्हणाला पण झाली तर मी धुवून देईन असे नाही म्हणाला... ते म्हणाला  असता तर मी दिली असती... त्यावर अभिजीत म्हणाला माझ झाल काम आणि गेला... माधवचे म्हणणे होते, विचारलं तर सांगना मी धुवून देतो, मी टीशर्ट देखील दिले असते. माधव पुढे म्हणाला, जर तुला एखाद्या गोष्टीची गरज आहे तर ती कशी मागितली पाहिजे, त्याला हे कळत कि भाकरी बनविण्यासाठी तेल मागण्याची पद्धत नीट पाहिजे तर एखाद्याला विनंती करताना ते कसं बोललो पाहिजे हे पण कळायला हवं ना ? किशोरीताईचे देखील म्हणणे होते, प्लीज आपण म्हणूनच शकतो. 

टॅग्स :बिग बॉस मराठी