Join us  

'द कपिल शर्मा शो'मध्ये पुन्हा कधीच येऊ शकणार नाही नवजोत सिंह सिद्धू, पाकिस्तानमुळे वाढली अडचण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 5:58 PM

Navjot Singh Sidhu : सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, नवजोत सिंह सिद्धू यांचं राजकीय करिअर आता संपलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे द कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल (Punjab Election Result 2022) समोर आला आणि मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहणारे नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) हे पराभूत झाले. त्यांनी पक्ष बदलला, बंडखोरी केली पण मुख्यमंत्र्यांची खुर्चीच काय ते विजयीही ठरू शकले नाहीत. अशात आता सोशल मीडियावर त्यांच्यावरील मीम्स व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया यूजर्स सिद्धू पुन्हा द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) जज बनतील अशी चर्चा करत आहेत. 

सोशल मीडियावर चर्चा होत आहे की, नवजोत सिंह सिद्धू यांचं राजकीय करिअर आता संपलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे द कपिल शर्मा शोमध्ये परत येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. लोक चिमटा काढत म्हणत आहेत की, आता अर्चना पूरन सिंहला शोमधील खुर्ची रिकामी करावी लागेल. पण अशातच फिल्ममेकर अशोक पंडित यांनी याबाबत एक खुलासा केला आहे. (हे पण बघा : सिद्धू यांच्या पराभवानंतर अर्चना पूरन सिंहच्या खुर्चीला धोका, व्हायरल झाले मजेदार मीम्स)

अशोक पंडित यांनी ट्विट करत स्पष्ट केलं की, इच्छा असूनही सिद्धू द कपिल शर्मा शोमध्ये पुन्हा परत येऊ शकत नाही. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, जे लोक नवजोत सिंह सिद्धू यांच्या कपिल शर्मा शोमध्ये परत येण्यावरून चर्चा करत आहेत. त्यांना सांगू इच्छितो की, Federation Of Western India Cine Employees ने नवजोत सिंह सिद्धू विरोधात पाकिस्तानचा सपोर्ट केल्यामुळे नॉन कॉपरेशन इश्यू केला आहे. याचा अर्थ ते कपिल शर्मा शोमध्ये येऊ शकत नाही.

अशोक पंडित यांचं हे ट्विट वाचून सिद्धूचे फॅन्स निराश नक्कीच होतील. सिद्धू यांच्यासाठी १० मार्च ही तारीख फारच निराश करणारी आहे. पंजाबमध्ये ज्याप्रकारे आम आदमी पार्टीने कॉंग्रेस आणि कॉग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा सूफडा साफ केला त्याने पार्टी चिंतेत असेल. यावरून सिद्धू यांना ट्रोल केलं जात आहे. तसेच त्यांच्यावरील मीम्सही व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :नवज्योतसिंग सिद्धूपंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२द कपिल शर्मा शो