Join us

आनंदी-राघवला एकत्र आणण्यासाठी टग्या करणार उपोषण; मालिकेत येणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 19:58 IST

Nava gadi nava rajya: टग्याने उचललेल्या या पावलामुळे आनंदी पुन्हा कर्णिकांच्या घरी जाईल का?

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे नवा गडी नवं राज्य. या मालिकेत आनंदी आणि राघव यांच्या आयुष्यात येत असलेल्या चढउतारांमुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. यामध्येच राघवपासून दूर राहात असलेली आनंदी पुन्हा कर्णिकांच्या घरी यावी यासाठी राघव, वर्षा, सुलक्षणाताई, आबा सारेच प्रयत्न करत आहेत. यामध्येच आता लहान मुलंदेखील त्यांना साथ देणार आहेत.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या प्रोमोमध्ये राघव, आनंदीला पुन्हा घरी आणण्यासाठीचे प्रयत्न करत असतो. मात्र, आनंदी घरी यायला तयार नसते. हे टग्या चोरून ऐकतो. त्यानंतर आनंदीला घरी आणण्यासाठी तो एक प्लॅन करतो आणि सगळ्या मुलांसोबत उपोषणाला बसतो. जोपर्यंत आनंदी कर्णिकांच्या घरी जाणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं टग्या ठरवतो.

दरम्यान, टग्याने उचललेल्या या पावलामुळे आनंदी पुन्हा कर्णिकांच्या घरी जाईल का? की, टग्याची समजूत काढून त्याचं उपोषण मागे घ्यायला लावेल हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. 

 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी