नारायणी आईच्या भूमिकेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 10:46 IST
क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नारायणी शास्त्रीने पियारंगरेजमध्ये काही महिन्यांपूर्वी काम केले ...
नारायणी आईच्या भूमिकेत?
क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नारायणी शास्त्रीने पियारंगरेजमध्ये काही महिन्यांपूर्वी काम केले होते. या मालिकेत तिची भूमिका प्रचंड गाजली होती. आता या मालिकेनंतर नारायणी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका नव्या प्रोडक्शन हाऊसची ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेत नारायणी आईची भूमिका साकारणार असून महिमा मकवाना तिच्या मुलीची भूमिकेत दिसणार आहे. महिमाने याआधी सपने सुहाने लडकपन के या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.