Join us
Daily Top 2Weekly Top 5

नायरा आणि कार्तिक लवकरच बनणार आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 20:30 IST

'यह रिश्ता क्या कहलाता है!'च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. टीव्हीवरील सर्वांचे लाडके दाम्पत्य नायरा आणि कार्तिक हे लवकरच आई-बाबा होणार आहेत.

'यह रिश्ता क्या कहलाता है'च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. टीव्हीवरील सर्वांचे लाडके दाम्पत्य नायरा आणि कार्तिक हे लवकरच आई-बाबा होणार असून त्यांच्या जीवनात एका नव्या व्यक्तीचा प्रवेश होणार आहे. पती-पत्नी असलेल्या कार्तिक आणि नायरा यांनी आता आपल्या नात्याला एका नव्या उंचीवर नेण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच पालक होणार आहेत. त्यांच्या चाहत्यांना आता नायरा प्रथमच गर्भवती राहिल्यानंतर या दोघांमधील नात्याचा एक नवा आणि अधिक अवघड पैलू पाहण्याची संधी मिळणार आहे.कार्तिक आणि नायरा आता त्यांच्या जीवनातील एका नव्या, हव्याहव्याशा टप्प्यात प्रवेश करणार असून त्यामुळे या दोघांच्या मनात आपल्यातील भावी नात्याबद्दल एक हुरहुर आणि साशंकता निर्माण झाली आहे. आपण आता पालक झाल्यावर आपल्यातील नातेसंबंध कसे राहतील आणि ते कशा प्रकारचे पालक बनतील, अशा प्रश्नांनी त्यांच्या मनात रुंजी घालण्यास प्रारंभ केला आहे. नात्याचा हा नवा टप्पा त्यांच्यातील अनुरूपतेची आणि त्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची कसोटी ठरणार आहे. या दाम्पत्याचा हा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सारे कुटुंबीय एकत्र येणार आहेत.आजच्या पिढीतील नवदाम्पत्यांना पालकत्वाच्या नात्याबद्दल वाटणाऱ्या काहीशा साशंकतेप्रमाणेच या दोघांच्या मनातही काही शंका उभ्या राहणार आहेत. एकमेकांच्या नजरेच्या टप्प्यापासून कधीच दूर न जाणारे कार्तिक व नायरा हे या काळातही एकमेकांच्या प्रेमाचे काही क्षण हळूच अनुभवताना दिसतील.स्टार प्लसवरील 'यह रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत पाहा या दाम्पत्याच्या जीवनातील या नव्या टप्प्यातील भावनिक हिंदोळा. नायराच्या गर्भारपणातही त्यांचे एकमेकांवरील हळुवार प्रेम चाहत्यांच्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाईल आणि त्यांना त्यांची अधिकच ओढ वाटेल. 

टॅग्स :स्टार प्लस