Join us
Daily Top 2Weekly Top 5

​16 ऑक्टोबरपासून नागिनचा दुसरा सीझन रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 14:57 IST

छोट्या पडद्यावर जोवर नागिन आहे तोवर त्या चॅनेलला चांगला टीआरपी मिळतो. त्यामुळंच की काय लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा ...

छोट्या पडद्यावर जोवर नागिन आहे तोवर त्या चॅनेलला चांगला टीआरपी मिळतो. त्यामुळंच की काय लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा नागिन अवतरणार आहे. नागिन-2 लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.  नागिनच्या दुस-या सीझनचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला. यांत शिवन्या बनलेली मौनी राय नागमणिवर आलेल्या संकटामुळे काळजीत पडलीय. आता यावेळी शिवन्या नागमणि वाचवण्यात यशस्वी ठरते का हे पाहणं रंजक ठरणार आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून नागिनचा दुसरा सीझन रसिकांच्या भेटीला येणार आहे