Join us

​नागिन-3 सुद्धा येणार रसिकांच्या भेटीला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 14:27 IST

छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका 'नागिन' रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. त्यामुळं त्याच्या सिक्वेलच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. लवकरच सप्टेंबरपासून ...

छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका 'नागिन' रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. त्यामुळं त्याच्या सिक्वेलच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. लवकरच सप्टेंबरपासून 'नागिन-2' रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र 'नागिन-2' या मालिकेचं आगमन होण्याआधीच 'नागिन-3'ची चर्चा सुरु झालीय. कारण नागिन-3 मध्ये भूमिका साकारणार असल्याचं नागिन मालिकेच्या पहिल्या सीझनमधील अभिनेता अर्जुल बिजलानीनं म्हटलंय. नागिनच्या यशानंतर दुस-या सीझनमध्ये अर्जुनची वर्णी लागलेली नाही. सध्या तो 'झलक दिखला जा-9'मध्ये पाहायला मिळतोय. मात्र नागिन-2मध्ये वर्णी का लागली नाही याबद्दल विचारलं असता त्यानं आपण नागिन-3 मध्ये झळकणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं नागिन मालिकेच्या फॅन्ससाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल.