Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘मेरी आवाज ही पहेचान है’ निरोप घेणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 12:07 IST

संगीताची पार्श्वभूमी आणि दिग्गज कलाकारांची फौज यामुळं 'मेरी आवाज ही पेहचान हैट ही मालिका सर्वार्थानं वेगळी ठरली. दिप्ती नवल, ...

संगीताची पार्श्वभूमी आणि दिग्गज कलाकारांची फौज यामुळं 'मेरी आवाज ही पेहचान हैट ही मालिका सर्वार्थानं वेगळी ठरली. दिप्ती नवल, झरीना वहाब, अमृता राव, अदिती वासुदेव, पल्लवी जोशी, एजाज खान असे कलाकार या मालिकेत पाहायला मिळाले. कधीही संपणार नाही असं कथानक असलं तरी आता ही मालिका रसिकांचा निरोप घेणार आहे. 15 जुलैपासून ही मालिका ऑफ एअर होणार आहे.. संगीताच्या सूत्रानं एकमेंकांशी घट्ट नातं जोडल्या गेलेल्या दोन बहिणींची कथा या मालिकेत रसिकांनी अनुभवली.तब्बल 21 वर्षांनंतरचा काळ दाखवत दोन्ही बहिणी भूतकाळात झालं गेलं विसरुन एकत्र येतात यानं मालिकेचा शेवट होणार आहे. या मालिकेला म्हणावं तसं रेटिंग्स मिळालं नसलं तरी वेगळ्या प्रयोगामुळं मेरी आवाज ही पहेचान है ही मालिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहिल..