मेरे साई या मालिकेत अबीर सूफी दिसणार साईबाबांच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 17:26 IST
मेरे साई ही मालिका सोनी वाहिनीवर २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात ...
मेरे साई या मालिकेत अबीर सूफी दिसणार साईबाबांच्या भूमिकेत
मेरे साई ही मालिका सोनी वाहिनीवर २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. या मालिकेत प्रेक्षकांना साईबाबांविषयी जाणून घ्यायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत प्रेक्षकांना अनेक मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत. या मालिकेचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. साईबाबांनी शिर्डी येथे समाधी घेतली त्याला यंदा 100 वर्षं पूर्ण होत आहेत. गेल्या 100 वर्षांत त्यांच्या पंथाचा व्यापक प्रसार झाला असून त्यांचा संदेश आणि त्यांची शिकवण यामुळे त्यांच्या लाखो अनुयायांना मनःशांती लाभली आहे. त्यांनी समाधी घेतल्याच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून टेलिव्हिजनवर त्यांचे चरित्र मेरे साई सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका प्रचंड भव्य असून या मालिकेसाठी मालिकेच्या टीमने सखोल संशोधन केले आहे. या मालिकेचे कथानक वास्तविक असून ते एका वेधक पटकथेद्वारे सादर होणार आहे. सोनी वाहिनीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दशमी क्रिएशन्स सादर करीत आहेत. दशमी हे एक प्रतिष्ठित टेलिव्हिजन प्रॉडक्शन हाऊस असून त्यांनी आजवर दुर्वा, मुलगी पसंत आहे यांसारख्या मराठी मालिका आणि मुरांबा, घंटासारखा मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या मालिकेसाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने आवश्यक ती सर्व मदत पुरवून या मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमला प्रचंड मदत केली आहे. मेरे साई या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अभिनेता अबीर सूफी साईबाबांच्या भूमिकेत दिसणार आहे तर तोरल रासपुत्र बायजाबाईची, वैभव मांगले कुलकर्णी सरकारची, अभिषेक निगम तरुण साई बाबांची, चिराग दवे म्हाळसापती, हेमंत थत्ते आप्पा कोते पाटील तर शर्मिला राजाराम चिऊ ताईची भूमिका साकारणार आहे. शर्मिला आणि वैभव मांगले या दोघांनी आजवर मराठी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. वैभव मांगले तर एक उत्कृष्ट विनोदी अभिनेता आहे. पण या मालिकेत प्रेक्षकांना तो एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या मालिकेतील भूमिकेला नकारात्मक छटा आहेत. Also Read : वैभव मांगले दिसणार या हिंदी मालिकेत