Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा... तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड', 'मुलगी झाली हो' फेम श्वेता अंबिकरची वडिलांच्या निधनानंतर भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 17:09 IST

अभिनेत्री श्वेता अंबिकरच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे.

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील माऊचे पात्र आणि कथानक प्रेक्षकांना खूपच भावलेले पाहायला मिळते याच कारणामुळे या मालिकेने नुकताच २०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मात्र या मालिकेतील अभिनेत्री श्वेता अंबिकरच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. तिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. 

अभिनेत्री श्वेता अंबिकरने इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले की, बाबा….तुमच्याशिवाय जगणं खूप अवघड आहे. वडिलांच्या निधनानंतर श्वेता कोलमडून गेली आहे. 

श्वेता अंबिकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने मुलगी झाली हो या मालिकेत आर्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेव्यतिरिक माझे मन तुझे झाले, दुर्वा, पुढचं पाऊल, बाजी, तू माझा सांगाती, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकांमधून काम केले आहे. भेट या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 

मुलगी झाली हो मालिकेचे गोव्यात होत असलेले मालिकेचे शूटिंग देखील नुकतेच बंद झाले आहे. त्यामुळे मालिका सध्या गुजरातमध्ये शूट करण्यात येईल असे बोलले जात आहे. याबाबत अधिकृत बातमी लवकरच समोर येईल. या मालिकेतील माऊ , आर्या, विलास, सिद्धांत, दमयंती ही सर्वच पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. त्यामुळे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता काही दिवसांसाठी तरी मालिकेचे कलाकार घरीच राहून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यावर भर देताना दिसणार आहेत. 

टॅग्स :स्टार प्रवाह