Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मिसेस मुख्यमंत्री' उर्फ अमृताच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 06:30 IST

अमृताने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका जूनच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांनी खूप चांगली दाद मिळते आहे. या मालिकेतील समर पाटील व खानावळीची मालकीण सुमी यांच्या प्रेमानं सगळ्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला आहे. या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. अमृताने नुकताच काळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.

अमृताने काळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

झी मराठी वाहिनीवर मिसेस मुख्यमंत्री या मालिकाद्वारे अमृता धोंगडे घराघरामध्ये पोहोचली आहे. अमृताने या मालिकेत काम करण्यापूर्वी ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याआधी लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख मला ‘मिथुन’ या चित्रपटातून मिळाली.

अमृताने या मालिकेत भूमिका मिळालेल्या संधीबद्दल एका मुलाखतीत सांगितलं की, हा चित्रपट केल्यानंतर सर्व लक्ष पदवीच्या अभ्यासावर केंद्रित केलं होतं. त्यामुळे त्या काळात फार काम केलं नाही. परीक्षा झाल्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली. खरं तर छोट्या पडद्यावर काम करण्याचा मी कधी विचार केला नव्हता. मात्र मालिकांत काम करण्याचा अनुभव घेऊन पाहू, असा विचार करून मी ऑडिशन दिली होती. त्यात माझी निवड झाली आणि मालिका मिळाली.

छोट्या पडद्यावर काम करणं तितकंच आव्हानात्मक आहे. मालिका प्रेक्षकांना रोज बघता यावी, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत घेणं देखील मी छान एन्जॉय करत असल्याचं अमृता सांगते.

टॅग्स :अमृता धोंगडेझी मराठी