Join us

मृणालने करिष्माला टिपले कॅमेºयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 19:49 IST

‘नागार्जुन-एक योद्धा’मधील राजवीर ऊर्फ शंखचूर्ण म्हणजेच मृणाल जैन हा उत्तम व व्यावसायिक छायाचित्रकारही आहे, ही बाब फारशी कोणाला ठाऊक ...

‘नागार्जुन-एक योद्धा’मधील राजवीर ऊर्फ शंखचूर्ण म्हणजेच मृणाल जैन हा उत्तम व व्यावसायिक छायाचित्रकारही आहे, ही बाब फारशी कोणाला ठाऊक नसेल. त्याने अनेकदा सेटवर अनेकदा आपल्या कॅमेºयातून छायाचित्रे काढून अनेकांना स्वत:मधील कौशल्याची जाणीव करून दिली. मृणालने नुकतीच आपली सहकलाकार करिष्मा तन्ना हिची सेटवरच व्यावसायिक छायाचित्रे काढली. करिष्मा या मालिकेत मस्किनी नावाच्या नागिणीची भूमिका साकारीत असून, नागलोक व पृथ्वीलोक या दोन जगासाठी तिची वेशभूषा अगदी भिन्न असते. मृणालने नेमकी हीच बाब कॅमेºयात अचूक पकडली आहे. करिष्मा तन्ना सांगते, माझा मित्र मृणाल हा उत्तम अभिनेता आहे. हे मला माहिती होतं, पण तो छायाचित्रकारही आहे, ही गोष्ट आधी मला माहित नव्हती. त्याने काढलेल्या छायाचित्रांमध्ये मी फारच छान दिसते. करिष्माची छायाचित्रे काढतानाच्या अनुभवाविषयी मृणालला विचारले असता तो म्हणाला, करिष्माची छायाचित्रे काढणं हा फारच सुखद अनुभव होता. तिला मी काढलेली छायाचित्रे आवडली.