Join us
Daily Top 2Weekly Top 5

​मोनिका डोगराने केले हॉट फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 13:27 IST

​मोनिका डोगराने तिचे काही हॉट फोटो इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला पोस्ट केले असून या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा आहे.

मोनिका डोगरा सध्या खतरों के खिलाडी या कार्यक्रमात एकापेक्षा एक भयानक स्टंट करताना दिसत आहेत. तिचे हे स्टंट तिच्या फॅन्सना खूपच आवडत आहेत. या कार्यक्रमामुळे तिला एक खूप चांगली मैत्रीण देखील मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या चित्रीकऱणादरम्यान तिची आणि गीता फोगटची खूप चांगली मैत्री जमली आहे. तसेच मोनिका एका हिंदी कार्यक्रमाचा भाग असली तरी तिला तितकेसे हिंदी येत नाही. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान ती मनवीर गुजरकडून हिंदीचे धडे गिरवत आहेत. खतरों के खिलाडी या कार्यक्रमामुळे मोनिकाच्या चाहत्यांच्या संख्येत देखील खूप वाढ झाली आहे.सध्या मोनिका खतरों के खिलाडी या कार्यक्रमामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर तिने नुकतेच पोस्ट केलेले काही फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. तिने नुकतेच पोस्ट केलेले सगळेच फोटो अतिशय हॉट असून तिचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मोनिकाने काही दिवसांपूर्वी एक फोटो शूट केले होते. त्याच फोटो शूटमधील काही फोटो तिने पोस्ट केले आहेत. तिने नग्न अवस्थेत काही फोटो काढले असून तिच्या हातावर आणि चेहऱ्यावर केवळ तिने रंग लावला आहे. मोनिकाने अशाप्रकारे फोटोशूट करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील तिने काही हॉट फोटोशूट केले होते. मोनिका नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोेटो पोस्ट करत असते. त्यामुळे इन्स्टाग्रामला चौदा हजाराहून अधिक लोक फॉलो करतात.