मॉनी लवकरच चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 15:47 IST
नागिन या मालिकेमुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री मॉनी रॉय लवकरच चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. मॉनीने जवळजवळ दहा वर्षांपूर्वी ...
मॉनी लवकरच चित्रपटात
नागिन या मालिकेमुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री मॉनी रॉय लवकरच चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे. मॉनीने जवळजवळ दहा वर्षांपूर्वी क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेनंतर तिने देवो के देव महादेव, कस्तुरी यांसारख्या मालिकेत काम केले. तसेच झलक दिखला जा, पती पत्नी और वो यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. छोट्या पडद्यावर आपले प्रस्थ निर्माण केल्यानंतर मॉनी आता लवकरच चित्रपटात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. निर्माते-दिग्दर्शक मनी रत्नम यांच्या अग्नि नचत्रिरम या तामिळ चित्रपटाचा हिंदीत रिमेक केला जाणार असून या चित्रपटात ती प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.