‘शनि’ मालिकेत गणेशाच्या भूमिकेत इशांत भानुशालीऐवजी दिसणार मोहन शर्मा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 18:57 IST
सध्या एका वाहिनीवर सुरू असलेल्या ‘कर्मफलदाता शनि’ या पौराणिक मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका शनि देवाच्या ...
‘शनि’ मालिकेत गणेशाच्या भूमिकेत इशांत भानुशालीऐवजी दिसणार मोहन शर्मा!
सध्या एका वाहिनीवर सुरू असलेल्या ‘कर्मफलदाता शनि’ या पौराणिक मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका शनि देवाच्या आयुष्यातील विविध अंगावर आधारित असून, सध्या मालिकेतील एका महत्त्वपूर्ण पात्रात बदल करण्यात आला आहे. होय, श्री गणेशाच्या भूमिकेत असलेल्या बालकलाकार इशांत भानुशाली याच्याऐवजी आता ही भूमिका अभिनेता मोहन शर्मा साकारताना दिसणार आहे. सुरुवातीला इशांतने अतिशय सुरेख पद्धतीने बालगणेशाची भूमिका साकारली आहे. पण आता निर्मात्यांनी या भूमिकेसाठी मोहनची निवड केली असून, गणेशाचे बदललेले रूपही प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे. ही मालिका शनिदेवाच्या आयुष्यावर आधारित आहे. प्रेक्षकांनी या मालिकेत शनि आणि सिंहिका यांच्यातील तेढ बघितले आहे. यात श्री हनुमान (क्रिश चौहाण) आणि श्री गणेशाने शनिला मदत केल्याचे दाखविण्यात आले आहे. कथेत आता शनि आणि हनुमान याच्यात काकोल या शनिदेवाच्या घनिष्ट मित्रावरून संघर्ष सुरू आहे. त्यांच्या या संघर्षाला घाबरून काकोल मदतीसाठी सूर्यलोकात पोहोचला आहे. शनि आणि हनुमानातील संघर्षात जेव्हा शनि हनुमानावर हल्ला करतात तेव्हा महादेवाला त्याच्या वेदना होतात. ते प्रचंड अस्वस्थ होतात. कालांतराने काकोल श्री गणेशाकडे हा संघर्ष थांबविण्यासाठी मदत मागतो. येणाºया भागात प्रेक्षकांना गणेश कशाप्रकारे मध्यस्थी करून शनि आणि हनुमानाला एकमेकांच्या कोपापासून वाचवितात हे बघावयास मिळणार आहे.