शायनी घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 12:36 IST
हमारी बहू रजनि_कांत या मालिकेतील शायनी दोशी प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे.शान आणि रजनी यांच्या जीवनाला एक कलाटणी देण्यासाठी ...
शायनी घेणार प्रेक्षकांचा निरोप
हमारी बहू रजनि_कांत या मालिकेतील शायनी दोशी प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे.शान आणि रजनी यांच्या जीवनाला एक कलाटणी देण्यासाठी मालिकेत समायराची एंट्री दाखवण्यात आली होती. पण आता मालिकेची कथा शान आणि रजनी यांच्यावर केंद्रित करण्याचे मालिकेच्या निर्मात्यांनी ठरवले आहे. शान आणि रजनीची केमिस्ट्रीच प्रेक्षकांना आवडते असे त्यांच्या लक्षात आल्यामुळे समायरा या व्यक्तिरेखेला निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शान आणि रजनीमध्ये भांडणे लावण्याचा समायरा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शान समायराला घरातूनच नव्हे तर त्याच्या आयुष्यातून निघून जायला सांगणार आहे.