Join us

​सरस्वती या मालिकेतील अस्ताद काळे घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 11:01 IST

सरस्वती ही मालिका गेल्या वर्षापासून सुरू असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना ...

सरस्वती ही मालिका गेल्या वर्षापासून सुरू असून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील सरस्वती, राघव आणि कान्हा या भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. सरस्वती आणि राघव यांची केमिस्ट्री तर या मालिकेत छान जुळून आली आहे. आता या मालिकेला एक नवे वळण मिळणार आहे.सरस्वती या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेतील राघव म्हणजेच अस्ताद काळे या मालिकेत आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत राघव या व्यक्तिरेखेवर हल्ला होणार असून त्यात त्याचा मृत्यू होणार आहे. सध्या या मालिकेत सरस्वती आणि राघव दुबईला फिरायला गेलेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघे बाहेर गेल्यामुळे त्यांच्यासाठी ही ट्रीप खूप महत्त्वाची ठरली आहे. या दोघांनी नुकतेच अनेक अविस्मवरणीय क्षण दुबईत घालवले. त्या दोघांनी दुबईतील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्याचसोबत खूप सारी शॉपिंग केली. दुबईला गेल्यापासून राघव सरस्वतीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आपले तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी तो सोडत नाहीये. राघवने तिच्यासाठी तिथे एक रोमँटिक गाणेदेखील गायले आहे. पण याच ट्रीपमध्ये सदाशिव त्यांच्या दोघांचा पाठलाग करत आहे. सरस्वतीला मारण्याच्या हेतून तो दुबईला आला आहे. पण आता या मालिकेच्या कथानकाला एक ट्विस्ट मिळणार आहे. सदाशिव सरस्वतीवर हल्ला करणार असे वाटत असतानाच हल्ला सरस्वतीवर नव्हे तर राघववर होणार आहे. राघवला गोळी लागणार असून त्यात त्याचा मृत्यू होणार आहे.