Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ये है मोहोब्बतेमधील इशिता म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी घेणार प्रेक्षकांचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 16:31 IST

ये है मोहोब्बते या मालिकेतील इशिता ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची चांगलीच लाडकी आहे. इशिताशिवाय या मालिकेचा प्रेक्षक विचारदेखील करू शकत ...

ये है मोहोब्बते या मालिकेतील इशिता ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची चांगलीच लाडकी आहे. इशिताशिवाय या मालिकेचा प्रेक्षक विचारदेखील करू शकत नाही. पण ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे कळतेय. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांना एकता कपूर आणि या मालिकेचे क्रिएटिव्ह डायरेक्टर संदीप यांचे संभाषण ऐकायला मिळत आहे. या संभाषणामध्ये एकता संदीपला म्हणतेय, संदीप तू इशिता या सगळ्यांच्या लाडक्या व्यक्तिरेखेला मारू शकत नाही. तुला ही गोष्ट करण्याची परवानगी नाहीये. त्यावर संदीप म्हणतो, माझी बॉस मला सांगते तेच मी करतो. त्यावर एकता त्याला विचारते तुला नोकरीवर कोणी ठेवले तर त्यावर संदीप हसत तिला सांगतो, तुम्ही आणि बालाजी टेलिफ्लिम्सने. त्यावर एकता त्याला म्हणते मी तुला कधीच इशिताला मारायला सांगितले नव्हते आणि आता तू माझ्या कार्यक्रमातील इशिताला मारत आहेस. या व्हिडिओसोबतच एकताने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्यात म्हटले आहे की, इशिताला काहीही झाले तर या माणसाला त्यासाठी दोषी ठरवा. सध्या इशिताची व्यक्तिरेखा साकारणारी दिव्यांका त्रिपाठी तिचा पती विवेक दहियासोबत नच बलियेमध्ये झळकत आहे. या कार्यक्रमात व्यग्र असल्याने तिच्या व्यक्तिरेखेला मारण्याचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे. तसेच सध्या या मालिकेचा टिआरपी ढासळला असल्याने तो परत मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट करून लोकांमध्ये कार्यक्रमाविषयी उत्सुकता वाढवली जात आहे अशी देखील जोरदार चर्चा लोकांमध्ये रंगली आहे.