Join us  

WHAT! माझी तुझी रेशीमगाठ: मालिकेतून परीने घेतला ब्रेक; समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 2:34 PM

'माझी तुझी रेशीमगाठ'. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. दिग्गज कलाकारांमध्ये चिमुकली मायरा तिच्या गोंडसपणामुळे आणि उत्तम अभिनयामुळे भाव खाऊन गेली.

छोट्या पडद्यावर सध्या तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या मालिकेत श्रेयस आणि प्रार्थनासह संकर्षण कऱ्हाडे, बालकलाकार मायरा वायकुळ यांनीही मालिकेची रंगत वाढवली आहे.

विशेष म्हणजे या दिग्गज कलाकारांमध्ये चिमुकली मायरा तिच्या गोंडसपणामुळे आणि उत्तम अभिनयामुळे भाव खाऊन गेली. त्यामुळेच परीची भूमिका साकारणारी मायरा आज प्रचंड लोकप्रिय बालकलाकार म्हणून ओळखली जाते. परंतु, आता या मालिकेतून परीने ब्रेक घेतला आहे. 

मालिकेतून ब्रेक घेऊन मायराने थेट कोकण गाठलयं. कोकणातले काही व्हिडीओ आणि फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट केले आहेत. मायराच्या तिच्या कुटुंबासोबत कोकणात ट्रीपला गेली होती. तिने तिचे ट्रॅव्हॅलिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. 

 मालिकेत काही दिवसांपूर्वीच यशच्या गर्लफ्रेंडची जेसिकाची एन्ट्री झाली आहे. जेसिकाच्या येण्यामुळे या मालिकेला एक वेगळंच वळण मिळालं असून ही मालिका आता आणखीनच रंजक झाली आहे. एकीकडे नेहाच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी यश, समीर, शेफाली सगळेच प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे नेहा तिच्या मनातील भाव सांगण्यास तयार नाही. त्यामुळेच आता यश मोठं पाऊल उचलणार आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठीप्रार्थना बेहरे