Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवमाणूस 2: सलोनीच्या खुनाचं सत्य होणार उघड; डॉक्टरांना रंगेहात पकडणार डिंपल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 16:31 IST

Devmanus 2: अजितकुमार सलोनीचा खून करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचा गुन्हा डिंपल रंगेहात पकडणार आहे.

छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेल्या 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेचा पुढील भाग 'देवमाणूस 2' (Devmanus 2) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या भागात ज्या गोष्टींचं गुढ कायम राहिलं होतं. त्या सगळ्याची उत्तरं या नव्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत. या दुसऱ्या भागामध्ये जुन्या कलाकारांसोबतच काही नवीन कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे सलोनी. डॉ. अजितकुमार देव म्हणजेच नटवरसिंगसोबत राजस्थानवरुन सलोनी आली आहे.परंतु, अजितकुमार तिचाही खून करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचा गुन्हा डिंपल रंगेहात पकडणार आहे.

अलिकडेच झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अजितकुमार, सलोनीचा खून करताना दिसत आहे. इतकंच नाही तर तिचा खून केल्यावर अजितकुमार तिचा मृतदेह नदीच्या पात्रात सोडतो. परंतु, अजितकुमारने सलोनीसोबत काही तरी बरं वाईट केलंय याचा अंदाज डिंपलला येतो आणि ती त्या दिशेने शोध घेते. यामध्येच त्याचं सत्य बाहेर येतं.

 दरम्यान, डिंपल, अजितकुमारला सलोनीसोबत नेमकं काय केलं? असा जाब विचारणार आहे. त्यामुळे आता अजितकुमार काय उत्तर देईल?, पुन्हा त्याचा खरा स्वभाव गावकऱ्यांसमोर येईल का? अशा प्रश्नांची उत्तर मालिकेतूनच प्रेक्षकांना मिळणार आहेत. या मालिकेत अभिनेत्री प्रिया गौतम हिने सलोनीची भूमिका साकारली आहे. प्रिया ही मूळची राजस्थानमधील जयपूर येथील आहे. देवमाणूस २ ही तिची पहिली मराठी मालिका आहे.

टॅग्स :'देवमाणूस २' मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार