Join us

"बाबांना एकेरी हाक मारायचे म्हणून लोक...", अभिनेत्री तन्वी मुंडलेनं स्पष्टच सांगितलं; म्हणाली... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:50 IST

अभिनेत्री तन्वी मुंडले मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Tanvi Mundle: अभिनेत्री तन्वी मुंडलेला (Tanvi Mundle) कोणत्याही परिचयाची गरज नाही. मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक आहे. अलिकडेच तन्वी 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. परंतु 'पाहिले न मी तुला' ही मालिका तिच्या आयुष्यात महत्वाची ठरली. या मालिकेमुळे ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. अभिनेत्रीची सोशल मीडियावर तगडी फॅनफॉलोइंग पाहायला मिळते. त्यामुळे चाहते तिच्यासंदर्भात जाणून घेण्यास कामय उत्सुक असतात. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तन्वी मुंडलेने तिच्या वडिलांविषयी मनातील भावना व्यक्त केल्या.

नुकतीच तन्वी मुंडलेने 'लोकमत फिल्मी'सोबत खास बातचीत केली. त्यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या अभिनय प्रवासासह वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. शिवाय मुलाखतीत तन्वीने तिच्या वडिलांविषयी भरभरून बोलली. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली की, "मला सांगताच नाही येणार की आमचं नातं कसं होतं. मी त्याला 'ऐ बाबा' असं म्हणते. हे आमच्या अख्ख्या खानदानात कोणाच्याच बाबतीत झालेलं नाही. बाबाला अरे, तुरे करणं हे कोणीच केलं नसेल. त्यात मी अशा बॅकग्राउंडमधून येते की कुडाळसारख्या ठिकाणची मी आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये कुणीही वडिलांना नावाने हार मारली नसेल. याबाबत माझ्या घरचे इतके कट्टर आहेत की नाही वडिलांना अहो-जाहो म्हटलं पाहिजे."

पुढे अभिनेत्री म्हणाली, "मी मोठी होत असताना माझे काही नातेवाईक होते ते म्हणायचे ही अजूनही अरे-तुरे करते. लहान होती तेव्हा ठीक होतं, आता तिने अहो-जाहो म्हटलं पाहिजे. पण, माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्हाला माहितेय तुमचं कनेक्शन काय आहे. माझ्या बाबांनी तेव्हाच मला सांगितलं की असं काही नाही, तू माझी लाडकी आहेस, आपलं नातं कसं आहे हे तुला माहितीये. तू मला अबु म्हणतेस, तर अबुच म्हण. मी तुझा अबुच आहे. तू मला बाबा नको म्हणू. मग मला असं झालं की तुम्ही कोण आहात. हे जे बाप-लेकीचं नातं आहे ते मैत्रीच्याही पलिकडचं आहे. म्हणजे आम्ही अगदी लॉंग ड्राईव्हला जायचो. आई फक्त घरी असायची. शिवाय तिकडे जाऊन काय करायचो आम्ही तर, काही नाही नुसते फिरायचो." अशा आठवणी अभिनेत्री या मुलाखतीमध्ये शेअर केल्या. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी