Join us

इन्स्टाग्रामवर पहिली भेट अन्...! अशी सुरु झाली शाल्व-श्रेयाची लव्हस्टोरी; फिल्मी आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:46 IST

इन्स्टाग्रामवर पहिली भेट अन्...! अशी जुळली शाल्व-श्रेयाची लग्नगाठ, फिल्मी आहे स्टोरी

Shalv Kinjwadekar: शाल्व किंजवडेकर हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर 'येऊ कशी तशी मी नांदायला'आणि'शिवा'यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. खऱ्या आयुष्यात शाल्व विवाहित आहे. त्याच्या पत्नीचं नाव श्रेया डफलापूरकर आहे. सर्व मालिकांमधील त्यांच्या प्रेमकहाण्यांची चर्चा होते. पण, फक्त ऑनस्क्रिन नाहीच तर तर अभिनेत्याची ऑफस्क्रिन प्रेमकहाणी देखील तितकीच खास आहे. याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. 

नुकतीच शाल्व किंजवडेकर आणि त्याची पत्नी श्रेया या दोघांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीविषयी सांगितलं. त्यादरम्यान, श्रेया म्हणाली, हे खरं आहे मी १८ वर्षांची असताना त्याला भेटले आणि त्यानंतर गोष्टी घडत गेल्या. त्या वयात स्वत:लाच समजून घेण्याचा तो काळ होता. पण, मला असं वाटतं, रिलेशनशिपबद्दल गांभीर्य हे २० व्या वर्षानंतर येऊ लागतं. मी १८ वर्षांची असताना याला भेटले. पण,१८-२५ वर्षांच्या वयामध्ये विचार खूप पटकन बदलतात. तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात.त्यासाठी एकमेकांना खूप समजून घ्यावं लागतं.बदलत्या वयानूसार स्वभाव सारखाच असतो पण विचार बदलू शकतात. हे सगळं त्याने सांभाळून घेतलं."

लव्हस्टोरीबद्दल बोलताना शाल्व म्हणाला,"आमची पहिली भेट इन्स्टाग्रावरच झाली. त्यानंतर सगळं घडत गेलं."मग शाल्वची पत्नी श्रेयाने पुढे सांगितलं,"हे खरं आहे की आम्ही एकमेकांना ओळखत होतो. आम्हाला एकमेकांची नाव माहिती होती. पण, आमची भेट इन्स्टाग्राममुळे झाली." 

शाल्व-श्रेया यांचा विवाहसोहळा १४ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. अभिनेत्याची पत्नी ही कॉस्ट्यूम डिझायनर आणि स्टायलिश म्हणून ओळखली जाते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram Meet to Proposal at 18: Shalv-Shreya's Filmy Love Story

Web Summary : Actor Shalv Kinjwadekar and Shreya Dafalapurkar shared their love story. They first met on Instagram. Shreya was 18 when Shalv proposed. The couple married on December 14, 2024. Shreya is a costume designer and stylist.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी